Fri. Sep 25th, 2020

Icc under 19 world cup : भारतीय अंपायर अनिल चौधरी यांचा बहुमान

आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेला १७ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी अंपायर आणि मॅच रॅफेरींची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये भारतीय अंपायर अनिल चौधरी यांना बहुमान मिळाला आहे. अनिल चौधरी यांची अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंपायर म्हणून निवड करण्यात आली आहे.

वर्ल्ड कपमधील पहिली मॅच यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळली जाणार आहे.

या सामन्यात न्यूझीलंडचे वेनी नाइट आणि श्रीलंकेचे रविंद्र विम्लासीरि हे अंपायर असणार आहेत. तर राशिद रियाज वकार हे टीवी अंपायर असणार आहेत.

अधिक वाचा : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

या व्यतिरिक्त इंग्लंडचे अनुभवी अंपायर इयन गोल्ड देखील असणार आहे. इयन गोल्ड यांनी गेल्या वर्षी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेतली होती.

वर्ल्ड कप स्पर्धेत १२ देशातील १६ अंपायर पहिल्या फेरीतील ५ मॅचमध्ये पंचाची भूमिका पार पाडतील. तर ८ अंपायर हे टीव्ही अंपायरची भूमिका बजावतील.

आयसीसीने वर्ल्ड कपसाठी तीन मॅच रेफरींची निवड केली आहे. यामध्ये श्रीलंकेचे माजी बॉलर ग्रीम लैब्रू, दक्षिण आफ्रिकेच्या शैद वादवला आणि इंग्लंडच्या फिल विटिकेस यांची निवड करण्यात आली आहे.

अंपायर : रोलँड ब्लॅक, अहमद शाह पाकतीन, सॅम नोगाजस्की, शफुदोला इब्ने शाहिद, इयन गोल्ड, वेनी नाइट, राशिद रियाज वकार, अनिल चौधरी, पेट्रिक बोंगानी जेले, इकनो चाबी, नाइजेल डुगुइड, रवींद्र विमालासिरी, मसूदुर रहमान, मुकुल, आसिफ याकूब, लेस्ली रीफर आणि एड्रियन होल्डस्टोक.

मॅच रेफरी : ग्रीम लेब्रू, शॅद वादवला आणि फिल विटिकेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *