Sat. Jun 12th, 2021

Icc Women’s T-20 World Cup Final : ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला विजयासाठी १८५ धावांचं आव्हान

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी तगडं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १८४ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ७८ बेथ मूनीने केल्या. तर एलिसा हीलीने 75 धावा केल्या.

टीम इंडियाकडून दिप्ती शर्माने २ तर राधा यादव आणि पूनम यादवने १ विकेट घेतला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाची धमाकेदार सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या ओपनरनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागदारी केली.

पहिल्या विकेटसाठी बेथ मूनी आणि एलिसा हीली या दोघांनी ११५ धावांची भागीदारी केली. ही सलामीची जोडी तोडायला राधा यादवला यश आलं.

यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाकडून ३९ धावांची भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला विशेष कामगिरी करता आली नाही.

दिप्ती शर्माच्या बॉलवर शिखा पांडेनी मेग लॅनिंगची कॅच घेतली. मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली.

यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाला एश्ले गार्डनर आऊट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *