Tue. Oct 19th, 2021

…म्हणून आई-वडील मधुबाला यांना घेऊन दिल्लीहून मुंबईत आले

14 फेब्रुवारी म्हणजेच आज मुगल-ए-आझमची अनारकली मधुबाला यांचा आज 86 वा वाढदिवस आहे.

योगायोग म्हणजे 14 फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवसही मानला जातो.

मधुबाला यांच्या 86व्या वाढदिवसानिमीत्त गुगलकडुनही डुडलद्वारे अभिवादन करण्यात आले आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

लाखो चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकविणाऱ्या मधुबाला यांचा 14 फेब्रुवारी 1933 साली जन्म झाला होता.

मधुबाला यांच्या बालपणाचे नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी असे होते, हे फार कमी लोकांना माहित आहे.

त्याच्यां वडिलांचे नाव अताउल्ला आणि आईचे नाव आयशा बेगम होते.

मधुबाला यांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली.

1927साली वयाच्या 14व्या वर्षी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं

या सिनेमानंतर मधुबालाला ‘सौंदर्याची राणी’ या नावानं ओळखलं जावू लागलं.

1942 साली ‘बसंत’ या सिनेमातून मधुबाला यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीला खरी सुरूवात झाली.

‘वीनस ऑफ इंडियन सिनेमा’ आणि ‘द ब्यूटी ऑफ ट्रेजेडी’ असे नाव मधुबाला यांना देण्यात आले होते.

मधुबाल यांचा अभिनय पाहून प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी खूप प्रभावित झाल्या त्यांनीच मधुबाला यांचं मुमताज बेगम जहाँ देहलवी हे नाव बदलून ‘मधुबाला’ असं नाव ठेवलं होतं.

मधुबाला यांच्या आयुष्यात खूप प्रसिद्धी-संपत्ती असेल मात्र, त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रचंड दु:ख भोगावे लागेल असे एका ज्योतिषाने आधीच सागितलं होतं.

ज्योतिषाचे हे भविष्य खोटे ठरावे म्हणून त्यांचे आई-वडील त्यांना घेऊन दिल्लीहून मुंबईत आले होते.

1960 मध्ये आलेला ‘मुगल-ए- आजम’ या सिनेमाने त्यांना यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचवले. या सिनेमात त्यांनी साकारलेली ‘अनारकली’ची भूमिका आजही अजरामर आहे.

1957 मध्ये ‘तराना’ या सिनेमातून दिलीप कुमार आणि मधुबालाची प्रेमकथा सुरू झाली.

दोघे प्रेमात इतके बुडाले होते की मधुबाला जिथे शूटिंग करत तिथे दिलीप कुमार जात असत. मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी तराना, संगदिल, अमर, मुघल ए आजम या सिनेमात एकत्र काम केलं.

मधुबालाचे वडील पिता अताउल्ला खान यांच्यामुळे ही प्रेम कथा अपूर्ण राहिली.

दिलीप कुमार नंतर त्यांच्या आयुष्यात किशोर कुमार यांची एन्ट्री झाली.

‘चलती का नाम गाडी’ मधील ‘एक लडकी भीगी भागी सी’ या गाण्याने किशोर कुमार यांनी मधुबालाच्या हृदयात आपली जागा निर्माण केली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले.

मधुबाला यांना ह्रदयाचा आजार झाल्याने त्या नेहमी अस्वस्थ राहत.

त्यांच्या ह्रदयाच्या आजारामुळे 23 फेब्रुवारी 1969 मध्ये त्यांचे निधन झाले.

मधुबाला यांच्या निधनानंतर 1971 मध्ये त्यांचा ‘जलवा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *