Fri. Feb 21st, 2020

रायगडमधील एसटी बसमध्ये सापडला IED बॉम्ब

रायगड जिल्ह्यातील कर्जत-आपटा एसटीमध्ये IED बॉम्ब सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड पथकाने घटनास्थळी दाखल होत हा बॉम्ब निकामी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कर्जत-आपटा एसटीमध्ये रात्री 11 वाजल्यापासून बॉम्ब सदृश्य वस्तू दिसल्याने खळबळ उडाली.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर रायगड अलिबागहून बॉम्ब स्क्वॉड पथक आपटा इथे रवाना झाले आणि या पथकाकडून बॉम्ब निकामी करण्यात आला.

दरम्यान, जवळजवळ 3 किलो पांढऱ्या रंगाच्या पाऊडर आणि डिटोनेटरपासून हा IED बॉम्ब तयार करण्यात आला होता.

हा बॉम्ब फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता.

एसटी बसमध्ये बॉम्ब आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *