‘ऑक्सिजनची मागणी वाढली तर मुख्यमंत्री कठोर निर्णय घेतील’ – अजित पवार

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली तर मुख्यमंत्री राज्यात निर्बंधांबाबत कठोर निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जर ऑक्सिजनची मागणी सातशे मॅट्रिक टनपर्यंत वाढली तर मुख्यमंत्री राज्यातील निर्बंधांबाबत कठोर निर्णय घेतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढवा घेतला. दरम्यान, त्यांनी नागरिकांना कठोर निर्बंधांबाबत सूचक इशारा दिला. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनची गरजसुद्धा वाढत आहे. आणि जर ऑक्सिजनची मागणी सातशे मेट्रिक टनपर्यंत वाढली तर राज्यात कठोर निर्बंध लागण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतली, असे ते म्हणाले.
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३ हजार ३५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आणि १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासन चिंतेत आले आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन विषाणूनेसुद्धा थैमान घातले आहे. काल राज्यात २३८ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.