Sat. Apr 17th, 2021

… तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता – उद्धव ठाकरे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताचे पहिले पंतप्रधान असते तर पाकिस्तानचा जन्म झाला नसता असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘सावरकर -इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

दादरच्या स्वातंत्र्यवीर स्मारक येथे ‘सावरकर -इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीरचा प्रश्न हाताळला असता तर त्यावेळीच सुटला असता.

त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानचा जन्म झाला नसता असंही म्हटलं आहे.

सावरकर सच्चे क्रांतीकार होते. त्यामुळे त्यांच्या हातून क्रांती घडली नसती तर इतिहास घडला नसता.

स्वातंत्र्यलढ्यात गांधी- नेहरूंचे योगदान असले तरी स्वातंत्र सावरकरांनी तुरूगांत 14 वर्षे यातना भोगल्या आहेत.

गांधी – नेहरूंनी 14 मिनिट तरी यातना सहन केल्या असता तर त्यांना वीर नेहरू म्हणून म्हटलं असतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *