पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास होणार ‘इतका’ दंड

पॅन कार्डला आधार कार्ड (Pan card – Aadhar card ) लिंक न केलेल्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पॅन कार्डासोबत आधार कार्ड संलग्न करण्याची ३१ मार्च २०२० ही शेवटची तारीख आहे.
या तारखेपर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास आर्थिक दंड भरावा लागणार आहे. पॅन-आधार लिंक न केल्यास १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
तसेच ३१ मार्च पर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास १ एप्रिलपासून पॅन-आधार रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच पॅन कार्डवरील तपशील चुकीचा असल्यास आणि ते ही आधारसोबत लिंक नसेल तरीही दंड भरावा लागेल.
इन्कम टॅक्स कायदाच्या सेक्शन २७२ बी नुसार हा दंड आकरला जाणार आहे. त्यामुळे दंड भरण्यापेक्षा शिल्लक दिवसांमध्ये पॅन-आधार लिंक करुन घ्या.
incometaxindiaefiling.gov.in या लिंकवर जाऊन घरबसल्या देखील पॅन-आधार जोडणी करता येणार आहे.