Tue. Sep 29th, 2020

सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करणार – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या घोषणांनी जोर धरला आहे.राहुल गांधीनी काही दिवसापूर्वीचं गरीबांना महीन्याला 12 केली होती.आता त्यांनी पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे. जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.नीती आयोगाची घोषणा झाली पण याद्वारे कोणतेही काम झालेले नाहूी. याचा फायदा फक्त मोदींनाच झाला आहे. असे हूी त्यांनी म्हटलं आहे.या आयोगाला पर्याय म्हणून नियोजन आयोग देखील आणण्यात येईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे राहुल गांधींचं ट्विट?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नीती आयोगाने फक्त मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय या आयोगाने काही केलेलं नाही.असा आरोपही त्यांनी केला आहे.

सत्तेत परतल्यानंतर नीती आयोगाच्या ठिकाणी अत्यंत छोटा नियोजन आयोग आणण्यात येईल.

या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. तर या आयोगात १०० पेक्षाही कमी लोकांचा भरणा असेल.

न्याय योजनेच्या घोषणेनंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी या योजनेविरोधात मत प्रदर्शित केले होते.

जर अशा प्रकारची कोणती योजना लागू करण्यात आली असेल  तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होईल.

राजीव कुमार यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *