Fri. Jan 28th, 2022

‘हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुका घ्या’ – सी. टी. रवी

  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे उद्घाटन भाजप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित होते. यावेळी ‘हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुका घ्या’, असे विधान करत राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे.

  ‘हिंमत असले तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुका घ्या. कोण जिंकले ते कळेल’, असे आव्हान सी.टी. रवी यांनी शिवसेनेला दिले आहे. शिवसेनेने भाजपला नाही तर जनतेला धोका दिला आहे. शिवसेना हिंदुत्व सोडून परिवार पार्टी राहिली आहे, असा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला आहे.

  ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात आणि कधी उठतात हे जनतेला ठाऊकच नसते’, अशी टीका सी.टी. रवी यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे फुलटाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हणत शिवसेनेने जनतेला धोका दिल्याचे ते म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *