Tue. Aug 4th, 2020

Corona : आयकर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ, दिलासादायक निर्णय

कोरोनामुळे देशावर मोठं संकट उभं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व एकजुटीने सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ मार्चपर्यंत संचारबंदी असल्याने आयकर परतावा कसा भरायचा, या चिंतेमुळे काही जणांचा जीव टांगणीला लागला होता. यामुळे आता अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिलासा दिला आहे. तसेच आयकर परतावा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी मुदतवाढ दिली आहे.

कोरोनामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकार लवकरच राहत पॅकेज देणार आहे.

सरकारने सर्व कर संदर्भातील मुद्द्यांच्या विषयाला म्हणडेच आयकर परतावा, जीएसटी भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच आधार-पॅन लिंक करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ती याआधी ३१ मार्च होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. आर्थिक वर्ष 2018—19 साठी आयटी रिटर्न भरण्यासाठी 30 जूनपर्यंत वाढीव मुदत दिली आहे.

जीएसटी फायलिंगची तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *