पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार सध्या सत्तेतून बाहेर शक्यता

पाकिस्तान इम्रान खान सरकार सध्या सत्तेतून बाहेर शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हालचालीमुळे इम्रान खान सरकारवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या सीनेटच्या निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) वरिष्ठ नेते यूसुफ रजा गिलानी यांनी इस्लमाबादमधून विजय मिळवला आहे. गिलानी यांना १६९ मतं मिळाली आहेत.
गिलानी यांचा विजय हा पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पीटीआय पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मरियम यांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केला असून ११ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये या अविश्वास प्रस्तावासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र मरियम यांनी ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी सीनेट निवडणुकीत देशाच्या अर्थमंत्र्यांचा पराभव झाल्यानंतर संसदेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं तर आता इम्रान खान सरकार सत्तेत राहणार की बाहेर होणार हे येणार काळचं सांगणार मात्र पाकिस्तान राजकीय वर्तुळात अनेक नेते आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहे. तसेच इम्रान यांच्या मंत्रीमंडळातील नेत्याचाच पराभव झाल्यानं पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट (पीडीएम) पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी इम्रान खान सरकारवर टीका केली आहे. शिवाय गिलानी यांच्या विजयामुळे विरोधी पक्षांपासून ते स्वपक्षीयांपर्यंत सर्वच स्तरातून इम्रान खान यांच्यावर टीका केली जात आहे.
हा पराभव स्वीकारुन इम्रान यांनी पंतप्रधानपद सोडावे अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचे अध्यक्षही आहेत. इम्रान खान यांनी आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याच्या विजयासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र गिलानी यांच्या पीपीपीने विरोधी पक्षातील पीडीएमच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढली आणि या निवडणूकीत त्यांनी विजय मिळवला. या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पंतप्रधानांनी बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असून पक्षाची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कुरेशी यांनी सांगितले.