Mon. Jul 6th, 2020

त्या बापाने केली स्वत:च्या 3 मुलांची निघृणपणे हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

अकोला जिल्ह्यातील धोतरडी येथे वडिलांनी स्वत:च्या 3 मुलांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे जवळच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी आहे की धोतर्डी येथे वडिलांनी आपल्या मुलांना विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फारसा परिणाम न झाल्याने 2 मुलांना शॉक देऊन ठार केले, तर एकाची हत्या डोक्यात वरवंट्याने घाव करून करण्यात आली आहे.

या सर्व प्रकारानंतर बापाने स्वत:ला इजा करून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणात तिन्ही मुलांचा मृत्यू झाला झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. विष्णू इंगळे असे वडिलांचे नाव असून मृतकांमध्ये अजय, मनोज, शिवानी या 3 मुलांचा समावेश आहे.

सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना देऊन देखील पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहचले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला आहे. आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *