Mon. Jul 6th, 2020

लग्नाला नकार दिल्याने तो संतापला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम

लग्नाला नकार दिला म्हणून १८ वर्षीय तरुणीला जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम येथे घडला आहे. हा भयानक प्रकार वाशिममधील सावळ गावात घडला आहे. रवी भालेराव असं आरोपी तरुणाचं नाव असून हा तरुण गावात राहणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. 19 जूनला तरुणी घरात एकटी असताना रवीने तिला लग्नासाठी विचारले मात्र तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला.

तरुणीच्या या नकाराने संतापलेल्या रवीने तरुणीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं. यामध्ये तरुणी ८० टक्क्याहून जास्त भाजली होती. जळालेल्या अवस्थेत तरुणीला अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर शनिवारी या तरुणीचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी रवी भालेरावला पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याणमध्ये खाकीला काळीमा, रक्षकच बनला भक्षक…

‘त्या’ जावयाने मारहाणीत तोडला सासऱ्याच्या नाकाचा शेंडा…

नागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या…

अरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *