कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 21 जणांची चाचणी निगेटिव्ह

कोरोना विषाणूने राज्यभरात थैमान घातलं आहे. काही जणांना लक्षणांमुळे तर काहींना संसर्गाने कोरोनाची लागण होत आहे. राज्यातून कोरोनामुळे नकारात्मक वातावरण तयार झालं आहे. मात्र नाशिकमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 21 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या 21 जणांना दिलासा मिळाला आहे. या 21 पैकी 19 जणांचा मंगळवारी निगेटीव्ह आला होता.
तर उर्वरित दोघांना कोरोना कक्षात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या दोघांचीही चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण 21 जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकड्यात वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३२०वर पोहोचला आहे. मंगळवारी हा आकडा ३०२ इतका होता. पण बुधवारी या आकड्यात वाढ होऊन ३२०वर पोहोचला. यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील १६ तर पुण्यातील २ करोनाग्रस्त रुग्ण आहेत.