प. महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची नावं एक-दोन दिवसांत निश्चित!

पुण्यात काँग्रेस भवनला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक पार पडलीय. प्रचार समितीची पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी यांच्यासह अनेक आजी माजी आमदारांनी हजेरी लावली होती.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची नावं एक-दोन दिवसांत निश्चित होईल असं स्पष्ट केलं.
सांगली, पुणे आणि सोलापूर येथील उमेदवारीवर गुरुवारी प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
उमेदवारी संदर्भात राज्य पातळीवर आणि दिल्लीत चर्चा झालीय.
त्याचबरोबर सेंट्रल इलेक्शनमध्ये एक बैठक झाली.
परवा पुन्हा बैठक होणार असून सीएसीत अंतिम निर्णय होणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय.
सुजय विखे पाटील यांची वैयक्तिक भूमिका!
सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बोलताना सुजय विखेंची वैयक्तिक भूमिका आहे.
ते भाजप पक्षात गेल्याने तो विषय आमच्या चर्चेत नाही.
राधाकृष्ण विखे कुटुंबीयांनी आम्ही काँग्रेसबरोबर असल्याचं म्हटलंय.
कॉंग्रेसमधे भाजपातील अनेक उमेदवार आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत.
मात्र भाजप दिशाभूल करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटलांनी केलाय.
काँग्रेसचे दरवाजे खुले असून अनेक नेते आमच्यात येणार असल्याचा दावा पाटील यांनी केलाय.
राजू शेट्टी यांचा अल्टीमेटम!
वरिष्ठ नेते राजू शेट्टी यांच्या संपर्कात आहोत.
त्यांना आजून एक जागेची मागणी आहे.
वर्धा आणि बुलढाण्याचा मागणी करत आहे.
एक जागा आम्ही देऊ एक जागा राष्ट्रवादीनं दिलीय.
एक जागा राष्ट्रवादीनं सोडली आहे तर आम्ही एक जागा सोडणार आसून कोणती जागा सोडवू हे निश्चित होईल,असंही पाटील यांनी म्हटलंय.
सोलापूर मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे निवडून येतील. तर वंचित आघाडी कशाने वंचित झाली आहे, हे सर्वांना माहीत आसल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय.
तसंच पुण्यातील उमेदवार निष्ठावंत असावा, असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.