Tue. Mar 2nd, 2021

उद्धव ठाकरेंवर अर्णब गोस्वामींचे जोरदार आक्रमण

सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला…

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अर्णब गोस्वामीची मुंबई उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळील आणि काही तासातच अर्णब गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला.

सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांची सुटका झाल्यानंतर ते त्यांच्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे ”उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामींनी म्हटलं. तसंच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार अशी घोषणाही त्यांनी केली. अर्णब गोस्वामीं इथेच थांबले नाही त्यांनी जोरदार आक्रमण करत “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” महाविकास आघाडी सरकाला त्यांची जागा दाखवून दिल्याचंही म्हटलं. दरम्यान, सरकारनं राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्णय केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला त्यानंतर अर्णब गोस्वामींनी अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठापुढे अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणी पार पडली होती. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी म्हटलं. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचही मत यावेळी न्यायलयानं सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *