Wed. Jan 26th, 2022

थोरातांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून वाटाण्याच्या अक्षता

राज्यातील अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना मृतकाच्या वारसाला एक लाख रुपये द्या, याबाबतचे पत्र काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची मागणी फेटाळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या मृतकाच्या वारसाला पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कोरोना काळात कोरोनामुळे मरण पावलेल्या नागरिकांच्या वारसाला ५० हजार रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली ही मदत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या नागरिकांच्या वारसाला मदत देण्यासाठी त्या व्यक्तीच्या पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात मांडण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या जवळील नातेवाईकाने राज्य शासनाने विकसित केलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. पुढील आठवड्यात ही वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. तसेच अर्जदार सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी-एसपीव्ही मधून अर्ज करू शकतील.

राज्य सरकारने काँग्रेसची मागणी फेटाळून राज्यातील करोना मृतकाच्य वारसाला ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कोरोना मृतकाच्या वारसाला १ लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी काँग्रेसची मागणी फेटाळली असून कोरोना मृतकाच्या वारसाला ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *