Thu. May 19th, 2022

अलिबागच्या माजी आमदारांचे वाढदिवसाच्या दिवशीच निधन

रायगड: अलिबाग उरण मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.मधुकर ठाकूर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून मधुकर ठाकूर आजारी होते.

त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष , प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावरअंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.