कोरोना चाचण्या वाढवा; केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना

देशात कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्याचसोबत ओमायक्रॉन विषाणूचा धोकादेखील वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना चिठ्ठी लिहून कोरोना चाचण्या कमी न करता वाढवा, अशा सूचना दिल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २ लाख ३८ हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्य कमी होत आहे.
मुंबईत काल ५ हजार ९५६ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४७९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान १५ हजार ५५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून मुंबईत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.