Corona : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकूण आकडा ४७

कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. मात्र तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीये. कोरोनाच्या संख्येतं दिवसेंदिवस वाढ होतं आहे.
मुंबईत कोरोनाचे २ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याल कोरोना रुग्णांची संख्या ही ४७वर पोहचली आहे. तसेच मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा हा १०वर पोहचला आहे.
कोरोनासंदर्भात अफवा पसरवल्यास कारवाई होणार
नव्याने कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण या महिला आहेत. तसेच या दोन्ही महिला परदेशातून परतल्या होत्या. या दोन महिलांपैकी एक महिला नुकतीच इंग्लडवरुन परतली होती. दुसरी महिला दुबईहून आली होती. दुबईहून आलेली महिला ही उल्हासनगरची आहे.
महानगरी मुंबई गुरुवारपासून राहणार अंशत: लॉकडाऊन
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही १७१वर पोहोचली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.