Mon. Dec 6th, 2021

हॉकीमध्ये भारताचा अर्जेंटिनावर शानदार विजय

भारतीय पुरुष संघाने हॉकीमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

भारताकडून वरुण कुमार, विवेक सागर प्रसाद आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले. या ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचा हा तिसरा विजय आहे. यापूर्वी त्याने स्पेन आणि न्यूझीलंडविरुद्धही विजय मिळविला आहे.

ग्रुप ए मध्ये भारताने चार पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा ३-१ असा पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा ७-१ असा पराभव झाला. तिसऱ्या लढतीत भारताने स्पेनवर विजय मिळवला आणि आज अर्जेंटिनाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.भारताच्या हरमनप्रीत कौरने पेनाल्टी कॉर्नरवर गोल करून आघाडी ३-१ अशी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *