Tue. Sep 28th, 2021

देशात तब्बल ७५ दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांवर

 

देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या ही वाढत आहे.

देशात सोमवारी ६० हजार ४७१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ही ७५ दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, तर सोमवारी १ लाख १७ हजार ५२५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंत देशात एकूण २ कोटी ९५ लाख ७० हजार ८८१ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ८२ लाख ८० हजार ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या ९ लाख १३ हजार ३७८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

देशात सोमवारी एकूण २ हजार ७२६ मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १ हजार ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *