Mon. Dec 6th, 2021

देशात शुक्रवारी ४४ हजार १११ नवे कोरोनाबाधित

देशात शुक्रवारी ४४ हजार १११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली आहे. तसेच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ९५ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी देशात ७३८ कोरोनारुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील कोरोनाची एकूण मृत्युसंख्या ४ लाख १ हजार ५० इतकी झाली आहे. शुक्रवारी ५७ हजार ४७७ रुग्ण बरे होऊन घारी परतले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ इतकी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांचा दर १.६२ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्क्यांवरपोहोचले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *