#PulwamaTerrorAttack : भारताचा पाकला दणका

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे.
पाकिस्तानची व्यापारासंर्दभात कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नॅशनचा दर्जा काढून घेतला आहे.
1966 साली भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता.
दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतण्यांच्या निर्णयाची माहिती अरुण जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा म्हणजे काय ?
जागतिक व्यापार संघटना आणि आंतराष्ट्रीय व्यापार नियमांच्या आधारे हा दर्जा दिला जातो.
१९९६ मध्ये भारताने पाकिस्तानला हा दर्जा दिला.
या नियमाअंतर्गत पाकिस्तानला व्यापाऱ्यात विशेष प्राधान्य
आयात आणि निर्यातमध्ये पाकिस्तानी व्यापाऱ्यांना विशेष सूट
पाकिस्तानला सर्वात कमी आयात शुल्क लागतं.
भारत- पाकिस्तानदरम्यान सीमेंट, साखर, ऑर्गोनिक रसायन,भाजीपाला, फळ, ड्राय फ्रूट्स स्टीलचा या वस्तूंचा व्यापार होतो.
पाकिस्तानला फटका बसणार
1 जानेवरी 1996 रोजी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता.
यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये सवलती मिळाल्या होत्या.
किमान निर्यात शुल्क आणि इतर विविध व्यापारी करांमध्ये सूट मिळाली होती.
या दर्जामुळे पाकिस्तानला भरपूर फायदा झाला होता.
हा दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तान सरकारवर व्यापारी वर्गाकडून दबाव येण्याची शक्यता आहे.