Mon. Apr 19th, 2021

भारत-इस्रायलची मिसाइल डिफेन्स सिस्टिमची चाचणी यशस्वी रित्या पार पडली

गेल्या आठवडयात भारत आणि इस्रायलने जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राद्वारे हवेत ५० ते ७० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान नष्ट करता येऊ शकते. शिवाय MRSAM सिस्टिममध्ये कमांड आणि कंट्रोल, अत्याधुनिक रडार, मोबाइल लाँचर्स आणि इंटरसेप्टर्सचा समावेश आहे. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने (IAI) मंगळवारी याबद्दलची माहिती दिली.

भारताची डीआरडीओ आणि इस्रायलच्या IAI ने मिळून ही मिसाइल डिफेन्स सिस्टिम विकसित केली आहे. “MRSAM एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिम ही नवीन, कल्पक आणि अत्याधुनिक सिस्टिम आहे. या सिस्टिमने हवाई धोक्यापासून संरक्षण करण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. प्रत्येकवेळी एअर डिफेन्स सिस्टिमची चाचणी एक जटिल प्रक्रिया असते” असे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सीईओ बोएझ लेवी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *