दिवाळीच्या दिवसात भारताने सीमेवर पाकिस्तानच्या आगळिकीला उत्तर दिले
दिवाळीच्या दिवसात भारताने सीमेवर जोरदार कारवाई करत पाकिस्तानच्या आगळिकीला उत्तर दिले आहे.

दिवाळीच्या दिवसात भारताने सीमेवर जोरदार कारवाई करत पाकिस्तानच्या आगळिकीला उत्तर दिले आहे. गेले चार दिवस पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत गोळीबार सुरु आहे. या हल्ल्यात ३ भारतीय नागरिकांसह 2 जवान शहीद झाले आहेत. त्याला चोख उत्तर देण्यासाठी शुक्रवारी भारताने आपली बचावात्मक कारवाई सुरु केली आणि अवघ्या काही तासात पाकिस्तानच्या अनेक चौक्या उध्वस्त केल्या.
पाकिस्तानच्या या चौक्यांमधून भारतीय सीमेच्या दिशेने गोळीबार आणि बॉम्बहल्ला सुरु होता. प्रतिउत्तर देण्याच्या उद्देशाने भारताने केलेल्या बचावात्मक कारवाईत पाकचे १० सैनिक मारले गेले आहेत.