Tue. Mar 31st, 2020

अभिनंदन! K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

के-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. गेल्या 6 दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून, त्याची मारक क्षमता 3500 किलोमीटर आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) K-4 क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

काय आहे K-4 क्षेपणास्त्राचं वैशिष्टय?

पाणबुडीमधूनही K-4 क्षेपणास्त्र डागता येऊ शकतं.

स्वदेशी बनावटीच्या अरिहंत सारख्या अण्वस्त्र पाणबुडयांवर हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येईल.

भारत आपल्या पाणबुडयांच्या ताफ्यासाठी पाण्याखालून हल्ला करु शकणारी दोन क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. K-4 त्यापैकी एक आहे.

K-4 ची मारक क्षमता 3500 किलोमीटर आहे

दुसऱ्या क्षेपणास्त्राची रेंज 700 किलोमीटर आहे.

तीन मीटर लांब क्षेपणास्त्र एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकतं.

पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे भारत आता हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.

आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता होती. भारताचा आता या देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.

अण्वस्त्र पाणबुडयांवर K-4 क्षेपणास्त्राची तैनाती करण्याआधी डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या करण्यात येतील. सध्या भारतीय नौदलाची आयएनएस अरिहंत ही अण्वस्त्र पाणबुडी कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *