Wed. Oct 27th, 2021

बुमराहचा फटका ग्रीनच्या तोंडावर लागल्यानंतर…

सिराज बॅट टाकून लगेच ग्रीनकडे धावला…

ऑस्ट्रेलियामधील सुरू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. मात्र, जसप्रीत बुमराहच्या अर्धशतकीय खेळीमुळे भारतीय संघ १९४ धावांपर्यंत पोहचू शकला आहे. जसप्रीत बुमराहने त्यांच्या आक्रमक खेळाने अर्धशतक झळकावलं शिवाय ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह त्याने नाबाद ५५ धावा केल्या त्याचबरोबर सिराजनेही २२ धावांची खेळी करत बुमराला चांगली साथ दिली.

बुमराहनं ४५ व्या षटकात कॅमरुन ग्रीनचा चेंडू समोर फटकावला. त्यानंतर बुमराहनं मारलेला हा फटका कॅमरुन ग्रीनच्या थेट तोंडावर लागला. चेंडू इतका वेग होता की ग्रीन जमीनीवर कोसळला. नॉन स्ट्रइकला असलेल्या सिराजनं बॅट टाकून लगेच ग्रीनकडे धावला त्यानंतर सिराजनं ग्रीनला धीर देत विचारपूस केली. या प्रसंगी बीसीसीआयनेही ट्विटर कर सिराजचं कौतुक केलं आहे. सिरजच्या खिलाडूवृत्तीचं सोशल मीडियावर कौतुक होतांना दिसत आहे.

भारतीय संघाच्या निराशाजनक खेळीमुळे काही नेटकरी इंडियन टीमला ट्रोल करतांना दिसत आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेला मयांक अग्रवाल अबॉटच्या गोलंदाजीवर २ धावा काढून बाद झाला शिवाय पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे टीम इंडिया संकटात सापडली होती. अखेरीस जसप्रीत बुमराहने अर्धशतकी खेळी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला.

अखेर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी अखेरच्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाची लाज वाचवली. ऑस्ट्रेलियाकडून जॅक वाईल्डरमथ आणि सेन अबॉटने प्रत्येकी ३-३ तर कॉनवे, सदरलँड, ग्रीन आणि स्वेप्सन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. हा सामना क्रिकेट प्रेमीसाठी निराशाजनक होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *