Fri. Jun 5th, 2020

टेस्टमॅचमध्ये इंडियाचा वेस्ट इंडिजवर 257 धावांनी विजय

सोमवारी झालेल्या जमैकाच्या सबीना पार्कमध्ये दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजला 257 रन्सनी पराभूत करून इतिहास रचला. टीम इंडियानं दोन सामन्याच्या सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव केला आहे.

इंडिया आणि वेस्ट इंडिज मध्ये सुरू असलेल्या टेस्टला काल विराम लागला आहे. ही टेस्ट इंडीयाने आपल्या नावे केली आहे. सोमवारी झालेल्या जमैकाच्या सबीना पार्कमध्ये दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजला 257  धावांनी   पराभूत करत इतिहास रचला.

टीम इंडियानं दोन सामन्याच्या सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा 2-0 असा पराभव केला आहे. या विजयामुळे भारताचे आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 120गुण झालेत आणि टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. भारतानं पहिल्यांदा वेस्ट इंडिजचा त्यांच्या होमग्राऊंडवर टी20, वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये हरवलं आहे.

याआधी टीम इंडियानं तीन सामन्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय 3-0 आणि वनडे सीरिज 2-0 मध्ये विजय मिळवला होता. सीरिजमधला पहिला वनडे पावसामुळे रद्द झाला होता.

टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला फलंदाजीला संधी दिली.  पहिल्याच डावात 416  रन काढले.  नंतर भारताने वेस्ट इंडिजचा पहिल्या डावात केवळ 117 रनवर रोखल. इंडिया टीमला 299 रनची आघाडी मिळाली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *