टीम इंडियाचा बांगलादेशवर एक डाव आणि 46 धावांनी विजय

कोलकाता : टीम इंडियाने ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत बांगलादेशवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर एक डाव आणि 46 धावांनी विजय प्राप्त केला आहे. या विजयासह टीम इंडियाने बांगलादेशचा 2-0 ने सुपडा साफ केला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरले ते इंशात शर्मा आणि उमेश यादव.
इशांत शर्माने पहिल्या डावात तर उमेश यादवने दुसऱ्या डावात प्रत्येकी 5 विकेट घेतले. इंशात शर्माला त्याने केलेल्या कामगिरीसाठी सामानावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
विशेष म्हणजे दोन्ही टेस्टमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर एक डावाने आणि तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला आहे.
बांगलादेशने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या डावात अवघ्या 106 धावा केल्या. या प्रत्युतरात टीम इंडियाने पहिल्या डावात 9 विकेट गमावून 347 धावांवर डाव घोषित केला.
यामुळे बांगलादेशला 241 धावांचे आव्हान मिळाले होते. पण प्रत्युतरादाखल बांगलादेशला 195 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला.