Wed. Jan 20th, 2021

ISSF World Cup : नेमबाज अभिषेक वर्माचा ‘सुवर्ण’ वेध!

बिजींग येथे सुरू असलेल्या ISSF (International Shooting Sport Federation) World Cup स्पर्धेत अभिषेक वर्मा या भारतीय नेमबाजाने सुवर्णपदक कमावलं आहे. 10 मी. च्या एअर पिस्तुल विभागात त्यानं ही कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे 2020 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचा प्रवेश नक्की झाला आहे. या होणाऱ्या 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नेमबाजी खेळासाठी अभिषेक हा पाचवा नेमबाज ठरणार आहे.  या स्पर्धेमध्ये रशिया आणि कोरिया या दोन देशांना मागे टाकत भारताने हे मेडल कमावलं आहे.

2020 च्या ऑलिम्पिकसाठी अभिषेक भारताचा पाचवा नेमबाज

वयाच्या 29व्या वर्षी अभिषेकने त्याचे पहिलं गोल्ड मेडल मिळवलं आहे.

नेमबाजीसाठी अभिषेकने पहिल्या फेरीपासूनच त्याची आघाडी कायम ठेवली होती.

अभिषेकने 242.7 अशा गुणांना आपल्या खात्यात कमावले होते.

या स्पर्धेमध्ये रशिया आणि कोरिया या दोन देशांवर मात करत भारताने सुवर्णपदक कमावले आहे.

यामध्ये अनुक्रमे चेर्नोसॉव्हला रौप्य तर सेयुंग्वो हानला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

या अभिषेकच्या कामगिरीमुळे त्याला 2020 च्या ऑलिम्पिकसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *