Wed. Sep 23rd, 2020

15 जानेवारी : भारतीय सैन्य दिवस

भारतात 15 जानेवारी हा भारतीय दिवस सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचं वर्षं सैन्य दिनाचं 72वं वर्ष आहे. सैन्य दिनाच्या दिवशी सैन्य प्रमुखांना सलामी दिली जाते. मात्र 15 जानेवारी रोजी हा भारतीय सैन्य दिन का साजरा केला जातो, हे ठाऊक आहे का?

भारतीय सैन्याची स्थापना 1776 मध्ये इस्ट इंडिया कंपनीने केली. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत. सैन्यदलाचं नाव ब्रिटिश भारतीय सैन्य होते. त्यानंतर त्याचे नाव भारतीय भूदल सैन्य असे नाव देण्यात आले.

15 जानेवारी 1949 रोजी भारतात शेवटचे ब्रिटीश कमांडर इन-चीफ जनरल फ्रांसिस बुचर यांच्या जागी लेफ्टिनेंट जनरल के एम करियप्पा यांना भारतीय सैन्याचे कमांडर इन चीफ करण्यात आलं.

लेफ्टिनेंट जनरल के एम करियप्पा
भारतीय सैन्याचे पहिले भारतीय लेफ्टिनेंट जनरल होते.
28 एप्रिल 1986 ला फील्ड मार्शल रँक देण्यात आला.
के.एम.करियप्पा हे पहिले अधिकारी आहे ज्यांना फिल्ड मार्शल ही उपाधी देण्यात आली.
दुसऱ्या महायुद्धात जपानला पराभूत केल्या बद्दल के.एम.करियप्पा यांना आॉर्डर आॉफ द एम्पायर ने सन्मानित करण्यात आलं.
1947च्या भारत-पाक युद्धाचं त्यांनी नेतृत्त्व केलं होतं.
1953ला भारतीय सैन्यातून निवृत्त झाले. वयाच्या 1993 साली वयाच्या 94व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सैन्य दिनानिमित्त अनेक पथके रेजिमेंट परेडमध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे अनेक चित्ररथ ही असतात. गेल्या वर्षी या परेडचे नेतृत्त्व लेफ्टिनेंट भावना कस्तूरी यांनी केले होते.
सैन्य दिनादिवशी सैन्य प्रमुखांना सलामी दिली जाते. यावर्षी सैन्य प्रमुखांऐवजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांना सलामी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *