Mon. Dec 6th, 2021

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघावर कोरोनाचं संकट

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर कोरोनाच संकट आलं आहे. इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या खेळाडूंची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत . गुरुवारी डरहॅममध्ये भारतीय संघ खेळाडूंविना बायो बबलमध्ये परतणार आहे.
विश्व कसोटी अजिक्यंपद स्पर्धेनंतर ब्रेकवर असणाऱ्या भारतीय संघातील दोन खेळाडूना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या महिन्यात न्यूझीलंडबरोबर विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुट्टीवर आहे. इंग्लंडमध्ये विविध ठिकाणी फिरण्यसाठी गेल्यानंतर त्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समजतं.
४ ऑगस्टपासून इंग्लंडविरोधात भारताची कसोटी मालिका सुरु होणार आहे. इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेला अद्याप २० दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत त्या खेळाडूंना विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईल. मात्र, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही पुन्हा कोरोना कसा झाला हा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *