Mon. Jan 24th, 2022

‘वर्ल्ड टेस्टचा अंतिम सामना जिंकणे मोठे आव्हान’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लॅडमध्ये होणा-या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीला रवाना होण्यापूर्वी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहली याने भारतीय संघावर कोणताही दबाव नाही, असा दावा केला आहे.

मात्र विराट कोहली याने वर्ल्ड टेस्टचा अंतिम सामना जिंकणे हे मोठे आव्हान असणार असल्याचं म्हटलं आहे. ‘मोठे आव्हान आणि हवामान वेगळे असले तरी सामोरे जाऊ’, असं विराट कोहली याने म्हटलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल नंतर भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मोठी मालिका देखील खेळावी लागणार आहे. या दोन्ही सामन्यांच्या दरम्यान बराच वेळ भारतीय संघाला मिळणार आहे.

इंग्लंडविरुद्धचे पाच कसोटी सामने ही एक महत्त्वाची मालिका असेल. त्यापूर्वी संपूर्ण संघाला पुन्हा एकत्र येण्यासाठी वेळ मिळेल. आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणे, आराम करणे आणि मुक्तपणे फिरण्याची संधी असेल, असेही विराट कोहली याने यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *