Thu. Mar 4th, 2021

मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होतोय, औवैसी यांचा गंभीर आरोप

भारतासमोर कोरोनाचं मोठं संकट उभं असताना त्याच्याऐवजी भारतातल्या मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप MIM चे अध्यक्ष खासदार असदुद्दिन औवैसी केला आहे. हैदराबादमध्ये त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. यापूर्वीदेखील सर्वपक्षीय चर्चेला आपल्याला आमंत्रित न करून सरकारने औरंगाबाद, हैदराबादचा अपमान केल्याचा आरोप औवैसी यांनी केला होता. आता भारतातल्या मुस्लिमांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी जिग्नेश मेवानी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील केंद्र सरकार मुस्लिम समाजाला बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे. यातच आता ओवैसी यांनी भर घातली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  दिल्लीच्या निजामुद्दिन येथे तबलिगी जमातच्या मरकजच्या कार्यक्रमात कोरोनाग्रस्त सहभागी झाल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे संशयीत आणि कोरोनाबाधितांना दिल्लीच्या क्वारंटाईन केंद्रात उपचारांसाठी ठेवण्यात आलं. मात्र हे लोक डॉक्टरांना सहकार्य करत नसल्याचा आरोप होत आहे. ते रुग्ण डॉक्टरांना मारहाण करत आहे, त्यांच्यावर थुंकत आहेत, नर्सेससमोर अश्लील चाळे करत आहेत, नग्न फिरत आहेत, अशा बातम्या प्रसारित झाल्या. इतकंच नव्हे, काही विकृतांनी उघड्यावर शौच केल्यामुळे अखेर क्वारंटाईन केंद्राला पोलिसांत FIR दाखल करावा लागलीय.

मात्र मुस्लिम असल्यामुळेच तबलिगीवरून आपल्याला माफी मागण्यासाठी विचारलं जात असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे. हिंदुत्वाचं नाव घेऊन अशा प्रकारचं कृत्य केलं असतं, तर त्याचा निषेध करायला सांगितला असता का, असा सवाल ओवैसी यांनी केला आहे. बहुसंख्यकांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. अयोध्येत राममूर्ती स्थापनेच्या वेळी लोकांनी गर्दी केली, मात्र त्यावर कुणीच बोलत नाही, असा आरोपही ओवैसी यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *