Tue. Nov 24th, 2020

आमदारांचा पगार दरमहिना 55 हजाराहून थेट सव्वा लाखावर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

तामिळनाडूमधील आमदारांना घसघशीत पगारवाढ देण्यात आली आहे. आमदारांचा पगार दरमहिना 55 हजाराहून थेट सव्वा लाख एवढा करण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री पलानिसामी यांनी बुधवारी विधानसभेत यासंबंधी घोषणा केली. 234 आमदारांचा मासिक पगार जवळपास दुप्पट करण्यात आला आहे.

 

यासोबतच आमदारांचा स्थानिक परिसर विकास निधीही वाढवण्यात आला असून दोन कोटींवरुन 2.5 कोटी करण्यात आला आहे.

 

आमदारांना जवळपास 100 टक्के पगारवाढ मिळाली आहे. सोबतच आमदारांची मासिक पेन्शन 20 हजार रुपये करण्यात आली आहे. आधी ही रक्कम 12 हजार रुपये

होती.

 

एकीकडे तामिळनाडूमधील शेतकरी जंतर मंतरवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना येथे आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ करत दुप्पट करण्यात आला

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *