Wed. May 18th, 2022

चीनकडून भारतीय युवकाचे अपहरण

चीन लष्कराने भारतीय युवकाचे भारतीय हद्दीतून अपहरण केले असल्याची माहिती अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार तापिर गाओ यांनी ट्विट करत दिली आहे.

चीन सैन्याने मंगळवारी अरुणचल प्रदेशमधील जिदो गावातील भारतीय युवकाचे अपहरण केले आहे. १७ वर्षीय मिराम तारोन असे या युवकाचे नाव आहे. अपहरणाच्या वेळी मिराम तारोनचा मित्र जॉनी चीन सैन्याच्या तावडीतून निसटला असल्याचे मिराम तारोनच्या मित्राने सांगितले आहे. दरम्यान, या युवकाच्या सुटकेसाठी भाजपा खासदार तापिर गाओ यांनी केंद्र सरकारला साकडं घातले आहे.

भाजप खासदार तापिर गाओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, अरूणाचल प्रदेशाचे उपमुख्यमंत्री चाऊना मीन आणि भारतीय लष्कराला या भारतीय युवकाची चीनी सैन्याच्या तावडीतून सुटकेसाठी आवाहन केले आहे.

1 thought on “चीनकडून भारतीय युवकाचे अपहरण

  1. You made various nice points there. I did a search on the subject and found the majority of folks will go along with with your blog.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.