Mon. Jan 17th, 2022

अमरावतीमध्ये देशातला सर्वात बलाढ्य बैल ‘गजा’

तुम्ही बलाढ्य हत्ती पाहिला असेल, पण सर्वांत बलाढ्य बैल पाहिलायत का? देशातला सर्वांत मोठा बैल अमरावतीमध्ये आहे. या बैलाचं वजन 1200 किलो आहे. या बैलाचं नाव ‘गजराज’ असून त्याला प्रेमाने ‘गजा’ म्हटलं जातं. अमरावतीत ‘सायन्सकोर’ मैदानावर युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्य स्तरीय कृषी महोत्सवात गजा हा खास आकर्षण ठरला.

या गजाची उंची साडेसहा फूट तर लांबी साडेदहा फूट आहे.

त्याचे वजन 1200 किलो आहे.

दिवसाला चक्क 50 किलो गाजरं, 100 किलो ऊस खातो.

त्याला दिवसाला 200 किलो खाद्य लागतं.

मात्र गजामुळे त्याच्या मालकाला वर्षाला 15-16 लाख रूपयांचा नफा होतो.

पहा व्हिडीओ

सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील यशवंत सायमोते यांचा हा बैल आहे.
यशवंत हे शेतकरी आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला.
त्यांच्याकडे 15-16 गुरे आहेत. त्याच्यातील खिल्लारी बैल आणि जर्सी गायीचे हे वासरू आहे.

गजाचा जन्म हा 2011 मध्ये झाला.
जन्मत:च त्याचं वजन 47 किलो होतं, असं यशवंत यांनी सांगितलं.

‘गजा’ जगातील सर्वात बलाढ्य बैल आहे असं यशवंत यांचं म्हणणं आहे.

‘गजा’चं नाव लिमका बुक रेकॉर्डमध्ये नोंदवलं जावं यासाठी यशवंत प्रयत्न करत आहेत.

गजाच्या या खास आकर्षणामुळे गजा चांगलाच फेमस झाला आहे. अनेक गावात गजाला कृषी प्रदर्शनासाठी बोलावलं जातं. त्यासाठी त्याचं महिनाभर आधी बुकींगही केलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *