बेरोजगारी वाढली; एप्रिलमध्ये टक्का वाढला

देशात बेरोजगारीमध्ये वाढ होत चालली आहे. भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये वाढला आहे. 7.6 टक्क्यांवर हा दर पोहोचला असल्याची माहीती मिळाली आहे. 2016 नंतरचा नीचांकी दर नोंदवण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालामधून ही आकडेवारी देण्यात आली आहे. एकीकडे देशात बेरोजगारी राहणार नाही. असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे बेरोजगारीचा दर वाढत चालला आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेला ही आकडेवारी समोर आल्याने सरकारला डोकेदुखी ठरणार आहे.
बेरोजगारी वाढली
बेरोजगारीची आकडेवारी सर्वसाधारणपणे दर पाच वर्षांनी जाहीर केली जाते.
भारतातील मार्चमध्ये 6.7 वर असणारा बेरोजगारीचा दर 7.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.
हा दर ऑक्टोबर 2016 नंतरचा एप्रिलमधील बेरोजगारीचा नीचांकी दर ठरला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) आपल्या अहवालात ही माहीती दिली आहे.
मार्चमध्ये बेरोजगारीच्या दरापेक्षा एप्रिलमध्ये त्यात वाढ झाली आहे.
अशी माहीती सीएमआयईचे प्रमुख महेश व्यास यांनी दिली आहे.
२०१७-१८मध्ये गेल्या 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी नोंदवली गेली.
नोटाबंदीनंतर 2018 पर्यंत एक कोटी १० लाख जणांनी रोजगार गमावले.
ऐन निवडणुकीच्या वेळेला ही आकडेवारी समोर आल्याने सरकारला डोकेदुखी ठरणार आहे.