‘अम्मा कँटीन’च्या धर्तीवर आता कर्नाटकात ‘इंदिरा कँटीन’ सुरू, 10 रुपयांत मिळणार जेवण
वृत्तसंस्था, तमिळनाडू
तामिळनाडूमधील ‘अम्मा कँटीन’च्या धर्तीवर आता कर्नाटकात ‘इंदिरा कँटीन’ सुरू करण्यात आलं. या कँटीनमधून गोरगरिबांना अवघ्या 10 रुपयांत भरपेट जेवण आणि 5 रुपयांत नाश्ता मिळणार आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते या कँटीनचं आज उदघाटन करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात बंगळुरूमध्ये 103 इंदिरा कँटीन उघडण्यात आले आहेत. या कँटीनमध्ये 5 रुपयांत शाकाहारी नाश्ता, 10 रुपयांत दुपारचे जेवण मिळणार आहे.
रात्रीच्या जेवणासाठीही अवघे दहा रूपये आकारण्यात येणार आहेत. ऑक्टोबरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 148 वी जयंती आहे. त्यानिमित्त बंगळुरूमधील 97 वॉर्डात आणखी ‘इंदिरा कँटीन’ उघडण्यात येणार आहेत.