Sat. Nov 27th, 2021

इंदौरमधील कोविड सेंटरचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’तर्फे व्यवस्थापन

इंदौरमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी देशातील दुसरे सर्वात मोठे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. इंदौरमधील खंडवा रोडवर राधास्वामी सत्संग भवन येथे ‘अहिल्यादेवी कोविड केअर सेंटर’उभारण्यात आले असून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’तर्फे या कोविड सेंटरचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

या कोविड केअर सेंटरमध्ये 6 हजार खाटांची क्षमता असून सध्या 600 खाटांसह कोविड सेंटर सुरू झालं आहे. या कोविड सेंटरचा खर्च स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकावरील या सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था आहे. तसेच जेवणाव्यतिरिक्त गरम आणि थंड पाण्याची व्यवस्थासुद्धा असणार आहे. इंदौरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या सेंटरमध्ये भरती करून घेण्यात येणार आहे. या कोविड सेंटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सेवा पुरवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *