Fri. Feb 21st, 2020

INDvBAN,2nd test : बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 106 धावांवर गडगडला

कोलकाता : बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 106 डावांवर गडगडला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशच्या कोणत्याही खेळाडूला टिकता आले नाही.

बांगलादेशकडून सर्वाधिक रन शादमन इस्लाम आणि लिटोन दास या दोघांनी केल्या. या दोघांनी अनुक्रमे 29 आणि 24 रन केल्या. तर टीम इंडियाकडून इशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतले. तसेच उमेश यादवने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट घेत इशांत शर्माला चांगली साथ दिली.

बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलांदाजांनी बांगलादेशला सुरुवातीपासूनच झटके द्यायला सुरुवात केली. बांगलादेशच्या 4 फलंदाजांना भोपळा देखील फोडता आला नाही. तर 4 खेळाडूंना दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *