Thu. Dec 3rd, 2020

INDvsAUS, 1st odi: म्हणून पंतच्या जागी केएल राहुल करतोय विकेटकिपींग

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली वनडे मुंबईत खेळली जात आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 256 धावांचे आव्हान दिले आहे.

यानंतर ऑस्ट्रेलिया बॅटिंग करण्यास आली. पण यावेळी ऋषभ पंत किपींग न करता केएल राहुल विकेटकीपरच्या भूमिकेत दिसला.

ऋषभ पंतचा टीममध्ये विकेटकीपर म्हणून समावेश केला आहे.

तरी देखील ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगवेळी किपींगसाठी पंत का आला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला.

म्हणून पंत किपींगला आला नाही

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. ऋषभ पंतला मॅचच्या 44 व्या ओव्हरमधील पॅट कमिन्सने टाकलेला बॉल ऋषभ पंतच्या हेल्मेटला जाऊन धडकला.

44 व्या ओव्हरमध्ये पंतने कमिंसने टाकलेल्या बॉलवर पूल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु बॉल बॅटला लागून हेल्मेटला लागला. यानंतर एश्टन टर्नरने कॅच पकडली. त्यामुळे पंतला माघारी जावे लागले.

हॅल्मेटला बॉल लागल्याने पंत फिल्डींगसाठी मैदानात उतरला नाही. पंतऐवजी केएल राहुलने किपींगची जबाबदारी सांभाळली. याबाबत बीसीसीआयने ट्विट केले आहे.

पंतने बॅटिंग करताना 28 धावांची खेळी केली.

दरम्यान पंतला सध्या डॉक्टरांच्या नजरेखाली ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *