Mon. Jan 17th, 2022

‘मराठी भाषा दिना’बद्दल जाणून घ्या महत्त्वपूर्ण गोष्टी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।

एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

आज म्हणजेच 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली.

त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केलं.

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस यानिमित्ताने आज ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

शिवाय 1999 वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून 21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.

दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके.

1974 मध्ये ‘नटसम्राट’ ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.

1964 मधील गोव्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

काय आहे मराठी भाषेचा इतिहास ?

मराठी भाषेचा उदय संस्‍कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झ़ाला, असं बहुतांशी मानलं जातं.

पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला.

देवगिरीच्या यादवांचा काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपीमधून लिहिली जाते.

महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली.

इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र  लिहिले.

त्यानंतर इ.स. 1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली.

संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.

शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला.

इ.स. 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला.

इ.स. 1960 मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *