Thu. Jul 16th, 2020

विठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

आषाढी यात्रेच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्य भरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात.

वारीमध्ये येणारा प्रत्येक भाविक हा सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील असल्याने मंदिर समितीने भाविकांना विम्याचे कवच दिले आहे.

यात्रेच्या काळात पंढरपूर शहर व परिसरात भाविकाचा अपघाती मृत्यु झाल्याने मंदिर समितीच्या वतीने भाविकाच्या वारसाला 2 लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे. अपाघातात कायम स्वरुपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये तर जखमी भाविकास 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

भाविकांसाठी विम्याचे कवच देणारे विठ्ठल मंदिर देवस्थान हे राज्यातील एकमेव ठरले आहे. यासाठी मंदिर समितीने न्यू इंडिया विमा कंपनीकडे 3 लाख रुपयांचा प्रियीयम भरला असून यात्रा काळात किमान 100 भाविकांना विम्याचा लाभ मिळणार आहे.

तसेचं यात्रा काळात भाविकांना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मंदिर समितीने यावर्षी 15 लाख लिटर मिनरल वॉटरचे वितऱण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

याशिवाय दर्शनदरबारी स्वच्छता यावर मंदिर समितीने लक्ष केंद्रीत केले आहे. वारीमध्ये भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी 15 ठिकाणी एलएडी स्क्रीनस बसविण्यात येणार आहेत.

ज्ञानेश्वर माऊलीच्या अश्वाचं निधन…

संत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *