Wed. Oct 27th, 2021

1 फेब्रुवारीला होणारअंतरीम budget सादर

येत्या 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार अंतरीम बजेट सादर करणार असल्याचं अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपासून केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चेला अर्थमंत्रालयाने आज पूर्णविराम दिला आहे.

अंतरीम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नवीन सरकार जुलै महिन्यात उर्वरीत वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

अर्थसंकल्प अरुण जेटली सादर करणार की पीयूष गोयल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अरुण जेटली सध्या उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे अर्थमंत्रालयाचा अतिरीक्त प्रभार गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

लोकसभेच्या तोंडावर आलेल्या या अंतरीम अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकरी, महिला, मध्यवर्गीयांना खूष करणाऱ्या घोषणा करु शकतात.

2019 Election अर्थसंकल्प

प्राप्तीकराची मर्यादा 2.5 लाखावरुन 3 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता.

शेतकरी, ग्रामीण भागासाठी आणि मध्यवर्गासाठी महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता.

कृषी मंत्रालयाने वित्त विभागाकडे काही योजनांची शिफारस केली आहे.

कर्जाचे हफ्ते नियमीत भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीची घोषणा.

कडधान्य पिकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना प्रीमियम माफ करण्याची शक्यता.

छोट्या शेतकऱ्यांना प्रती एकरी 4 ते 12 हजारापर्यंत अनुदान देण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *