Thu. Oct 22nd, 2020

‘जागतिक दिव्यांग दिन’: दिव्यांगांची ‘ही’ हिंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक

संयुक्त राष्ट्रसंघाने हे एकत्रित कार्य करून अपंगांसाठी ‘जागतिक दिव्यांग दिन’ हा जाहीर केला आहे. हा दिवस दिव्यांगासाठी व त्यांच्या कार्य क्षमतेसाठी साजरा केला जातो.

इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देण्याचे काम मुंबईतील 55 दिव्यांगांनी केलंय..फिनिक्स फाऊंडेशन मुंबई आणि रोटरी क्लब जुहू यांनी दिव्यांगासाठी रायगड भ्रमंती या सहलीचे आयोजन केले होते..विनामुल्य सहभाग असणाऱ्या या सहलीचे स्वरुप ट्रेकिंगचे होते. कोणी कुबड्या घेऊन तर कुणी दोन्ही हातात काठ्या घेऊन असे पन्नासएक दिव्यांग रायगड चढत होते..सर्वसामान्य माणसाला गड चढताना धाप लागते, मात्र या दिव्यांगांची हिंमत पाहून अनेक जण अवाक झाले…जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष करीत चढाई केली..

 

disableraigad.jpg
या दिवसाचा इतिहास:

  • इ. स. १९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे.
  • दिव्यांगाच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी १९९२ मध्ये जनरल असेंब्ली ने कार्यक्रम सादर केला होता.
  • १९८१ मध्ये जनरल असेंब्ली ने जाहीर केलेले अपंगत्व वर्षे. तसेच जागतिक अपंगत्व दशक (१९८३ ते १९९२) हे दिव्यांगाचा संपूर्ण सहभाग आहे आणि बरोबरी या भावना वाढवण्यासाठी ह्या दशकाचा वापर केला गेला.
  • १९९९ साठीची यांची थीम ही “सर्वांना नविन शतकाची प्रतिक्षा आहे.” जवळजवळ अर्धा बिलीयन लोक, शारीरीक, न्सेसरी, मानसिक यापैकी कोणत्याही प्रकारामुळे अपंग आहेत. ते जगाच्या कोणत्याही भागात राहात असले तरी त्यांच्या आयुष्यावर शारीरीक व सामाजिक प्रकारची अनेक बंधने येतात.
  • संयुक्त राष्ट्रसंघातफेऱ्या १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते. दशकअखेरीस तीन डिसेंबरची निवड झाली होती व १९९२ मध्ये पहिला ‘अपंग दिन’ साजरा झाला होता.

ह्या दिवशी जनरल असेंब्ली अपंगत्वाबाबत जागृकता, त्यांना राजकीय, सामाजिक, कार्यक्रमास सामील करून घेण्याची भावना वाढवण्यासाठी कार्य केले जाते. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून या दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *