Thu. Dec 2nd, 2021

IPL 2020 : मुंबई टीमच्या सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल टी-२० स्पर्धेला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचं हे १३ वा हंगाम असणार आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई विरुद्ध चेन्नई असा होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या वेबसाईटवर १३ व्या हंगामाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे आयपीएलच्या या १३ व्या हंगामातील साखळी फेरीतील पहिला आणि शेवटचा सामना मुंबई टीम खेळणार आहे. शेवटच्या सामन्यात मुंबई बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे.

मुंबई टीम साखळी फेरीत एकूण १४ सामने खेळणार आहे.

मुंबई टीमच्या सामन्यांचे वेळापत्रक

मुंबई विरुद्ध चेन्नई, २९ मार्च, मुंबई

हैदराबाद विरुद्ध मुंबई, १ एप्रिल, हैदराबाद

मुंबई विरुद्ध बंगळुरु, ५ एप्रिल, मुंबई

पंजाब विरुद्ध मुंबई, ८ एप्रिल, मोहाली   

कोलकाता विरुद्ध मुंबई, १२ एप्रिल, कोलकाता

मुंबई विरुद्ध राजस्थान, १५ एप्रिल, मुंबई

मुंबई विरुद्ध पंजाब, २० एप्रिल, मुंबई,

चेन्नई विरुद्ध मुंबई, २४ एप्रिल, चेन्नई  

मुंबई विरुद्ध कोलकाता, २८ एप्रिल, मुंबई

मुंबई विरुद्ध दिल्ली, १ मे, मुंबई

दिल्ली विरुद्ध मुंबई, ६ मे, दिल्ली

मुंबई विरुद्ध हैदराबाद, ९ मे, मुंबई

राजस्थान विरुद्ध मुंबई, ११ मे, जयपूर

बंगळुरु विरुद्ध मुंबई, १७ मे, बंगळुरु

आता पर्यंत एकूण आयपीएलचे १२ हंगाम झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४ वेळा मुंबईने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशा एकूण ४ वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.

तर मुंबईचा १ वेळेसच अंतिम सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नई विरुद्धच्या २०१० सालच्या अंतिम सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

असं आहे आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

1

2

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *