आयपीएलच्या आजच्या लढतीत मुंबई इंडियन्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आजचा सामना प्ले-ऑफ निश्चितीसाठी होणार…

आयपीएलच्या आजच्या लढतीत मुंबई आणि बंगळूरू ह्यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्हीही संघ यंदाच्या हंगामातील विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे, असे असले तरी दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाची झळ बसली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नई विरुद्ध पराभव स्वीकारला होता तर मुंबई इंडियन्स ने राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव स्वीकारला होता. मुंबई आणि बंगळूरू दोन्ही संघ गुणतलिकेत १४ गुणांनी अनुक्रमे १ आणि २ स्थानावर आहेत.
आजचा सामना हा प्ले-ऑफमध्ये जागा निश्चितीसाठी होणार आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ ह्या आधी आमनेसामने आले होते त्यावेळी मुंबई वर बंगळुरूने विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबई आज बंगळूरूला पराभवाची परतफेड करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्याला दुखापतग्रस्त आहे. दुखापतीमुळे रोहितला २ सामन्यांना ह्या आधीच मुकावे लागले आहे. आजचा सामना देखील रोहित खेळू शकेल की नाही ह्या बद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. रोहित शर्माचे दुखापत मुंबईसाठी चिंतेची बाब ठरू शकते तर बंगळूरूला ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. वर्चस्वाच्या ह्या लढाईत कोणता संघ बाजी मारतो हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आज संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागणार आहे.