Jaimaharashtra news

आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोण बाजी मारणार

आयपीएलची सामने शेवटच्या टप्प्यात आली असताना काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे ह्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. हैद्राबाद विरुध्द बंगळूरू ह्यांच्यात झालेल्या सामन्यात हैद्राबादने प्रथम गोलंदाजी करत बंगलोरला केवळ १३१ धावतच यशस्वीपणे रोखले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या फलंदाजांनी हैद्राबादच्या गोलंदाजी समोर घुडगे टेकले. एरन फिंच च्या ३२ आणि डेविलर्स च्या ५६ धावांच्या जोरावर बंगलोरने १३१ धावा काढल्या मात्र हैद्राबादने हे आवाहन १९.४ षटकांमध्ये पूर्ण करत आपले यंदाच्या आयपीएलमधीलं अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

हैद्राबाद कालचा सामना जिंकली जरी असली तरी अंतिम फेरीत जाण्यासाठी उद्या दिल्ली सोबत लढत द्यावी लागणार आहे. दिल्लीने याआधीच मुंबई सोबत पराभव पत्करला होता. त्यामुळे आता अंतिम फेरीत जाण्यासाठी दिल्ली हैद्राबाद सोबत भिडणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या युवा खेळाडूंना रोखण्याचे आव्हान हैद्राबाद समोर असणार आहे तर दुसरीकडे अनुभवी खेळडूंची कमी नसलेल्या हैद्राबादला रोखायला दिल्लीला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार हे नक्की. जिंकणारा संघ हा मुंबई विरुध्द अंतिम सामन्यात खेळताना दिसेल तर हरणाऱ्या संघाचा प्रवास इथेच संपेल. उद्याच्या सामन्यात दिल्लीवाल्यांची दिल्ली बाजी मारते की हैद्राबादचे नवाब सामना खिशात घालतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उद्याची वाट बघावी लागणार आहे.

Exit mobile version